नुतन महाविद्यालयाचा 74 टक्के निकाल

WhatsApp Image 2019 05 28 at 16.54.14

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाने फेब्रुवारी 2019 मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल आज मंगळवारी जाहिर झाला आहे. नुतन महाविद्यालयाचा 74 टक्के निकाल लागला असून विद्यार्थीनी घवघवीत यश संपादन केले आहे.

तिन्ही शाखेतील सायन्स 94.23 टक्के निकाल, कॉमर्स 76 टक्के, कला शाखा 50 टक्के निकाल लागला आहे.  कल्पेश सोनवणे याने 86.15 टक्के मिळवून कला शाखेमध्ये प्रथम तर भावेश ज्ञानेश्वर नन्नवरे याने 72.08 टक्के मिळवून दुसरा क्रमांक मिळवला आहे. कॉमर्स विभागात विवेकानंद चौधरी याने 76.61 टक्के मिळवून प्रथम तर विशाल ईश्वर धनगर याने 74.38 दुसरा क्रमांक मिळवला आहे. आणि विज्ञान विभागातून दाफेरे सुमेरण गुणवंत याने 83.8 टक्के मिळवून प्रथम तर मोरे अश्विनी नितीन हिने 80.76 टक्के मिळवून दुसरा क्रमांक मिळवला आहे. इतर सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नूतन मराठा महाविद्यालयाने प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Add Comment

Protected Content