कासोदा, ता. एरंडोल (वार्ताहर) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य नूरुद्दीन मुल्लाजी यांना संत गाडगेबाबा सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल शेख फॅमिलीतर्फे त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
शेख मोहल्ल्यात त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील सुप्रसिद्ध डॉ. शेख अहमद यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला. प्रस्ताविक भाषणात डॉ. अहमद यांनी सांगितले की, माझे मित्र मुल्लाजी आमचे वर्गमित्र असून त्यांना समाजसेवेची आवड शालेय जीवनापासून होती. त्यामुळे त्यांना हा पाचवा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडो, अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. त्यांना नेहमी सहकार्य करण्याचे वचन देतो. यावेळी प्राथमिक शिक्षक असलम यांनी आपल्या मनोगतात मुल्लाजी यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली.
सत्काराला उत्तर देताना नूरुद्दीन मुल्लाजी यांनी सांगितले की, पुरस्कार मिळाल्याने व माझा सत्कार झाल्याने माझी जबाबदारी वाढली आहे. मी शेवटच्या क्षणापर्यंत समाजकार्य करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक शेख जाकीर शेख इस्माईल, शेख निसार, मुजफ्फर अली, शेख फिरोज, लियाकत अली सफदर अली, आरिफ पेंटर, हमजे खान, शेख अतिक, शेख मुशताक हाजी शेख मुसा, शादाब शेख मुशताक, यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.