जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नर्सिंग व्यवसायातील सेवाभाव, समर्पण आणि मानवतेच्या मूल्यांची जपणूक करण्याचा संकल्प जळगावातील नर्सिंग विद्यार्थ्यांनी लॅम्प लाईटिंग आणि प्रतिज्ञा कार्यक्रमातून केला. गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग आणि डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात बी.एस्सी., जी.एन.एम. आणि ए.एन.एम. अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी नर्सिंग व्यवसायातील कर्तव्यनिष्ठा, रुग्णसेवा आणि मानवतेची मूल्ये जपण्याची शपथ घेतली. नर्सिंग क्षेत्रात कार्यरत असताना रुग्णांची सेवा ही सर्वोच्च ध्येय मानून काम करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुष्पेंद्र निकुम उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नर्सिंग क्षेत्र हे केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे पवित्र माध्यम असल्याचे सांगितले. रुग्णसेवेच्या कार्यात सहानुभूती, संयम आणि समर्पणाची भावना आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमास गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, डी.एम. कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील, अधिष्ठाता डॉ. एन. एस. आर्वीकर आणि डॉ. प्रशांत सोलंकी हेही उपस्थित होते. या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत नर्सिंग क्षेत्रातील सेवाभाव जपण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्य प्रा. विशाखा गानवीर तसेच डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य प्रा. शिवानंद बिरादार यांची उपस्थिती होती. यावेळी उपप्राचार्य प्रा. प्रणिता गायकवाड, प्रा. जॅसिंथ धावा तसेच प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे उपस्थित होते.
हा कार्यक्रम स्वराज बॅचच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. मीनाव देवी, प्रियंका जगताप, कॅलॉट लोंढे, सचिन पवार, साक्षी गायकवाड आणि मानसी ढोबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास व्यवस्थापन, प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या लॅम्प लाईटिंग आणि प्रतिज्ञा कार्यक्रमातून नर्सिंग विद्यार्थ्यांनी मानवतेची सेवा, रुग्णांप्रती सहानुभूती आणि व्यावसायिक प्रामाणिकपणा जपण्याचा निर्धार व्यक्त केला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नर्सिंग व्यवसायाबद्दलची बांधिलकी अधिक दृढ होत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.



