नवी दिल्ली वृत्तसंस्था । फेसबुकने अधिकृत यूजर्सच्या पोस्टवर लाइक्स काउंटना हाइ़ड करणे सुरू केले आहे. आता इतर लोकं आपले लाइक्स बघू शकणार नाहीत. आणि Tag suggestions फीचर देखील बदलण्यात आल्याची माहिती फेसबुकने दिली असून सर्वात प्रथम २७ सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाच्या प्लॅटफॉर्मवरून सुरुवात करण्यात येणार आहे.
फेसबुकवर दुसऱ्याच्या पोस्टला जास्त लाइक्स मिळाल्याचे पाहून आपला जीव जरा खाली वर होतो. हा अनुभव अनेकांना आला असेलच. इतरांच्या पोस्टवर जास्त लाइक पाहत असताना आपल्या पोस्टला जेव्हा अतिशय कमी लाइक्स आल्याचे पाहूनही आपण नाराज होत असतो. म्हणूनच फेसबुकवर चाललेल्या लाइक्सच्या या स्पर्धेकडे सर्वजण लाइक-वॉर असल्यासारखेच पाहत असतात. ही सगळी परिस्थिती लक्षात घेस फेसबुकने लाइक्स लपवण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ असा की, कोणत्या पोस्टला किती लाइक्स मिळाले हे कळणार नाही. इतरांना मात्र म्युच्युअल फ्रेंड्सच्या नावांसह प्रतिक्रियांचे आयकॉन दिसत राहतील. अशा प्रकारे इतर युजर्स एकमेकांच्या पोस्टवर आलेल्या लाइक्स आणि प्रतिक्रिया पाहू शकणार नाहीत. यामुळे कमी लाइक्स, की जास्त लाइक्सची स्पर्धा कमी करण्यात मदत मिळणार आहे.