एनटीएने यूजीसी नेट २०२४ परीक्षेच्या नवीन तारखा केल्या जाहीर

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नॅशनल टेस्टिंग एजन्सीने शुक्रवारी यूजीसी नेट २०२४ परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या. ही परीक्षा आता २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान पुन्हा घेतली जाईल, असे एनटीएने शुक्रवारी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. यूजीसी नेट जून २०२४ परीक्षा यापूर्वी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. परंतु, ती आता संगणक-आधारित चाचणी मोडमध्ये घेतली जाईल, असं अधिसूचनेत म्हटले आहे. एनसीईटी २०२४ साठी संगणक आधारित चाचणीची तारीख १० जुलै असेल, तर संयुक्त सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षा २५ जुलै ते २७ जुलै या कालावधीत होईल. दरम्यान, अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षा २०२४ पूर्वीच्या नियोजित वेळेनुसार ६ जुलै रोजी होणार आहे.

यापूर्वी १८ आणि १९ जून रोजी परीक्षा नियोजित करण्यात आली होती. १८ जूनच्या परीक्षेला ३१७ हून अधिक शहरांमध्ये दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आली. यामध्ये जवळपास ९ लाखांहून अधिक उमेदवारांनी परीक्षा दिली. परंतु, १९ जूनची परीक्षा रद्द करण्यात आली. पेपर लीक झाल्याचे कारण देत ही परीक्षा रद्द करण्यात आली. “डार्कनेटवरील यूजीसी नेट प्रश्नपत्रिका यूजीसी नेटच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आम्ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या पेपरफुटीची आम्ही जबाबदारी घेतो आणि व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करतो असे नवनिर्वाचित शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. सीएसआयआर यूजीसी नेटवरही या पेपरफुटीचा परिणाम झाला. ही परीक्षा २५ ते २७ जून रोजी होणार होती. याचीही प्रश्नपत्रिका डार्क वेबवर लीक झाल्यामुळे शिक्षण मंत्रालयाने ही परीक्षाही पुढे ढकलली.

Protected Content