आता नगरपालिका व नगरपंचायतींमधील सदस्य संख्याही होणार कमी !

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीतील सदस्य संख्या आधी इतकीच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता नगरपालिका आणि नगरपंचायतीतील नगरसेवकांची संख्या देखील कमी होण्याचे संकेत मिळाले आहेत. भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही मागणी केली आहे.

अलीकडच्या काळात राज्य सरकारने महापालीका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील वाढलेली सदस्य संख्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता २०१७ सालच्या सदस्य संख्येइतकीच सदस्यांची संख्या राहणार आहे. अर्थात, आधीची प्रभाग, गट आणि गण रचना राहणार आहे. आता या पाठोपाठ नगरपालिकांमध्येही हाच प्रकार होणार असून भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही मागणी केली आहे.

बावनकुळे यांनी आधी केलेल्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. यामुळे त्यांनी नगरपालिका आणि नगरपरिषदांमधील सदस्य संख्या आधीप्रमाणेच असाव्यात अशी मागणी केल्याने ही मागणी देखील पूर्ण होण्याची शक्यता बळावली आहे.

Protected Content