
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात टेलिकॉम कनेक्शनच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्राय मोबाईल नंबर १० आकड्यांवरुन आता ११ अंकी करण्याचा विचार करत आहे.
लवकरच ट्रायकडून तुमचा मोबाईल नंबर ११ आकडी करण्यात येईल. रिपोर्टनुसार, सिम कार्डच्या संख्येतही वाढ करण्याचा विचार केला जात आहे. देशात टेलिकॉम कनेक्शनच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे ११ अंकी मोबाईल नंबर केले जाणार आहेत. ट्रायनुसार २०५० पर्यंत टेलिकॉम कनेक्शनच्या सर्व गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतात. याशिवाय 260 कोटी आकड्यांची गरज लागणार आहे. त्यामुळे ट्रायने मोबाईल नंबरच्या आकडे वाढवण्याचा निर्णय घेतला. ट्रायने मोबाईल नंबरचे १९९३ आणि २००३ मध्ये विश्लेषण केले होते. त्यानुसार कनेक्शनच्या मागणीत होत असलेल्या वाढीमुळे नंबर रिसोर्सेजला धोका होऊ शकतो. यासाठी ट्रायने मोबाईल नंबरचे आकडे वाढवण्याचा निर्णय घेतला.