मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रात आता इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे शिक्षण मराठीतून करता येणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली.
विश्व मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यात त्यांनी वैद्यकीय आणि अभियांत्रीकीचा अभ्यासक्रम मराठीत उपलब्ध करण्यात येणार असल्याची घोषणा केली. महाराष्ट्रात लवकरच अभियांत्रिकी असो वैद्यकीय असो वा कोणतही शिक्षण असो मराठीतून सुरू कऱणार आहोत. त्यामुळे मराठी ज्ञानभाषा होणार, अशी घोषणाही फडणवीसांनी केली.
या संदर्भात फडणवीस म्हणाले की, मोदीजींच्या लक्षात आलं की, भारतीय भाषा टीकवायच्या असतील तर त्यांना ज्ञान भाषांमध्ये रुपांतरीत करावं लागेल. जोपर्यंत उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण आणि ज्ञानआधारित अर्थव्यवस्थेवरील शिक्षण हे आपल्या मातृभाषेत होत नाही, तोपर्यंत आमच्या भाषा वैश्विक भाषा होऊ शकत नाही. त्यामुळे मोदींनी नवीन शैक्षणिक धोरणात सर्व राज्यांना सूचना केल्या की, राज्यांनी आपल्या मातृभाषेत सर्व उच्च आणि तंत्रशिक्षणाचा सिलॅबस सुरू करा आणि त्यातून शिक्षण द्या. यात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे.