आता बँक बुडाली तरी घाबरू नका : ९० दिवसात मिळणार पैसे !

नवी दिल्ली | बँका बुडाल्याने अनेक ठेविदारांच्या ठेवी बुडत असतात. यावर उपाय म्हणून आज केंद्र सरकारने डीआयसीजीसी कायद्यात बदल केला असून यामुळे यापुढे कोणतीही बँक बुडाल्यास ९० दिवसात ठेवी परत मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुडीत निघालेल्या बँकेच्या ठेवीदारांना ९० दिवसांमध्ये पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठेवीदारांला पाच लाख रुपये दिले जाणार आहेत. केंद्र सरकारने बँक ठेवीदारांच्या आर्थिक संरक्षणासाठी हे पाऊल उचलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत  डिपॉझिट इन्शुरन्स अॅण्ड क्रेडिट ग्यारंटी कॉर्पोरेशन अर्थात डीआयसीजीसी कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याची माहिती दिली.

हे दुरुस्ती विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. कायद्यात ही दुरुस्ती केल्यानंतर खातेधारकांना आणि ठेवीदारांच्या पैशाला आर्थिक सुरक्षा मिळणार आहे. ज्यामुळे कोणतीही बँक बुडाली तर विमा संरक्षणानुसार खातेधारकांना आणि ठेवीदारांना ९० दिवसांच्या आत पैसे मिळणार आहे. हा निर्णय सर्व बँकासाठी लागू असणार आहे, अशी माहितीही अर्थमंत्र्यांनी दिली.

Protected Content