जळगाव प्रतिनिधी । आपल्याला ईडीने नोटीस बजावल्याची माहिती कानावर आली असली तरी अद्याप आपल्याला नोटीस मिळालेल नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने नोटीस बजावल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ईडीने त्यांना चौकशीसाठी ३० डिसेंबर रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया देतांना एकनाथराव खडसे यांनी आपल्याला ही नोटीस मिळालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्याला जेव्हा नोटीस मिळेल तेव्हाच आपण या प्रकरणी बोलू असे ते म्हणालेत. दरम्यान, खडसे यांना ईडीची नोटीस मिळाल्याची राजकारणात तीव्र प्रतिक्रीया उमटण्याचे संकेत मिळाले आहेत.