मेहरूण तलावावर उत्तर भारतीयांची छठ पूजा उत्साहात (व्हिडीओ)

जळगाव संदीप होले । मेहरून तलावावरील गणेश घाट येथे उत्तर भारतीय संघ छठ पूजा समितीतर्फे छठ पूजा बुधवार १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उत्साहात साजरा करण्यात आला. या ठिकाणी सूर्याला अर्ध्य प्रदान करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, उत्तर भारतीयांचा दरवर्षीप्रमाणे छठपूजा हा उत्सव मेहरूण तलावातील गणेश घाट या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. त्या दिवशी सूर्याची पूजा करुन अर्ध्य प्रदान करण्यात येते. त्याचप्रमाणे याठिकाणी मागण्यासाठी आणि विश्‍वशांतीसाठी सूर्याजवळ प्रार्थना केली जाते. दरवर्षीप्रमाणे उत्तर भारतीय संघाच्या छठपूजा समितीतर्फे बुधवारी १० नोव्हेंबर रोजी मेहरुण तलाव घाटावर पूजा करण्यात आली. यावेळी पहिल्या अर्ध्य सायंकाळी ५.३० वाजता प्रदान करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ६.३० ते रात्री १० या वेळेत भजन कीर्तन महाप्रसाद वितरण या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी छठपूजा समितीचे अध्यक्ष ललन यादव, राम मनोहर सहानी, चंदन सहानी, राजेश शर्मा, मोतीलाल वर्मा, चंदन सहानी, राजेश सुहानी, राम मोरया, यशवंत मिश्रा, प्रिन्स दुबे, राजेश शर्मा आदी उपस्थिती होती.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/215924523952913

Protected Content