जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्र. कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांनी कर्मचाऱ्याची गोपनिय माहिती त्रयस्थ व्यक्तीला दिल्याचा प्रकार समोर आल्याने आज (दि.२६ जुलै) रोजी विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ. भादलीकर यांचा कुलगुरूंनी राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी कृती संघटनेच्या नेतृत्वाखाली कामबंद ठिय्या आंदोलन सुरू केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट विद्यापीठातील प्र कुलसचिव डॉ एस आर भादलीकर यांनी विद्यापीठात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची गोपनिय माहिती पुण्यातील उच्च शिक्षण संचालक कार्यालयात तोंडी मागणी केल्यावरून माहिती पाठविली. विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्र कुलसचिव डॉ. एस.आर भादलीकर यांचा राजीनामा कुलगुरूंनी घ्यावा या मागणीसाठी दुपारी २ वाजेपासून कामबंद ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनात कृती गटाचे अध्यक्ष शरद पाटील, सचिव भैय्या पाटील, उपाध्यक्ष सुरेश चव्हाण, दुर्योधन साळुंखे, अनिल पाटील, संजय सपकाळे, अजमल जाधव, महेश पाटील, अमृत दाभाडे, जगदीश सुरळकर, आर.एम.पाटील, गोकुळ पाटील, विलास बाविस्कर, सुरेखा पाटील, वैशाली वराडे, जयश्री शिनगारे, विठ्ठल पाटील, आर.डी.पाटील, डी.बी. बोरसे, शिवाजी पाटील, भीमराव तायडे, रवि फडके, सुनिल निकम, यांच्यासह इतर कृती समितीचे सर्व सदस्य व सर्व कर्मचारी हजर होते.
या प्रमुख प्राध्यापक संघटना, अधिसभा सदस्य गिरीश पाटील, मागासवर्गीय संघटना यांनी पाठींबा दिला आहे. यावेळी प्रा. अनिल पाटील, प्रा संजय सोनवणे, प्रा. इ.जी. नेहते, प्रा.के.जी. कोल्हे, प्रा. नितीन बाविस्कर, प्रा. प्रविण बोरसे, प्रा. सचिन नांद्रे, प्रा. वासुदेव वले, प्रा. गोसावी आदी उपस्थित होते.दरम्यान, प्रभारी कुलगुरू ई. वायूनंदन यांनी कर्मचार्यांशी चर्चा करतांना भादलीकर यांच्यावर उद्या कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने आजचे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.