कासोदा परिसरात अवकाळी पावसाची हजेरी

कासोदा, ता. एरंडोल प्रतिनिधी । कासोदा तसेच परिसरात आज सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून यामुळे कडाक्याच्या उष्णतेपासून काही काळ तरी ग्रामस्थांची सुटका झाली आहे.

कासोदा व परिसरात आज सायंकाळी वादळी वार्‍यांसह पावसाने हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून असणार्‍या कडाक्याच्या उष्णतेपासून यामुळे अल्पकाळ का होईना मुक्तता झाल्याने ग्रामस्थांना थोडे हायसे वाटले. तथापि, वादळ व पावसामुळे आंब्याच्या मोहरावर परिणाम होणार असल्याचे स्पष्ट आहे. यासोबत अनेक शेतकर्‍यांच्या शेतामध्ये चारा पडून असल्याने त्यांचेदेखील यामुळे नुकसान होणार आहे.

Add Comment

Protected Content