महायुतीकडून परभणीसाठी महादेव जानकरांना उमेदवारी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर करण्यात आली आहे.

ही घोषणा पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली. यावेळी ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, व राष्ट्रवादीच्या वतीने एकत्र येत परभणी लोकसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादीच्या वाट्याला आली. दरम्यान, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व आम्ही पक्षातील सर्वांन एकत्र येत निर्णय घेतला व परभणीची जागा ही राष्ट्रवादीच्या कोट्यातून रासपला देण्यात आली. या ठिकाणी अधिकृत उमेदवार म्हणून महादेव जानकर हे असतील. भाजपने २४ जागावर उमेदवार घोषणा केली. शिवसेनेच्या वतीने देखील अधिकृत ८ उमेदवारांची घोषणा करण्यात आली. तसेच राष्ट्रवादीच्या वतीने देखील सात ते आठ जागा मागितलेल्या आहेत. परंतु आज प्रामुख्याने आम्ही मागितलेल्या जागांमध्ये परभणी लोकसभा मतदारसंघ होता. त्याठिकाणी आम्ही रासपला ही जागा देण्याचा निर्णय घेतला.

परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची असल्याने ही जागा राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकारासाठी सोडली आहे आणि ते परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार असणार आहे. त्यामुळे आता महादेव जानकर यांचा सामना महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटाचे परभणीचे विद्यमान खासदार संजय जाधव यांच्याशी थेट लढत आहे.

Protected Content