नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. २० मार्च पासून पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सूरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यासाठी मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहेत. विदर्भातील काही मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यातील नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातही मतदान होणार आहे. यात नागपूरसाठी ४३ आणि रामटेकसाठी २५ उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत, तर नागपूरसाठी एका उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे.
नागपूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी व्यंकटेश्वरा महा स्वामी यांनी आज अर्ज दाखल केला आहे. पहिल्याच दिवशी नागपूर लोकसभेसाठी ४३ उमेदवारांनी ८२ अर्ज, तर रामटेक लोकसभा मतदार संघासाठी २५ उमेदवारांनी ३१ अर्ज घेतले. २७ मार्चपर्यंत सकाळी ११ ते ३ पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे