Home Cities जळगाव रायपूर येथील तरुणाला नोकरीच्या आमिषाने गंडविले

रायपूर येथील तरुणाला नोकरीच्या आमिषाने गंडविले


froud news

जळगाव प्रतिनिधी । मुलाला आरोग्य खात्यात चालक लावून देण्याचे आमिष दाखवत रायपूर येथील सेवानिवृत्त रेमंड कर्मचाऱ्याची त्यांच्याच जवळच्या नातेवाईकाने 5 लाख 60 हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयितास अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, मधुकर नारायण बाविस्कर (वय-60) रा. कुसुंबा ता.जळगाव हे रेमंड कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांना दोन मुले असून मोठा मुलगा नाशिक तर लहान मुलगा महेश चालक म्हणून खासगी नोकरी करतो. मधुकर बाविस्कर यांचा नातेवाईक मामेभाऊ एकनाथ उर्फ छोटू आनंदा सोनवणे रा. केकत निंभोरा ता. जामनेर यांनी महेशला चालक म्हणून आरोग्य खात्यात लावून देतो असे सांगून 10 लाख रूपये लागतील असे सांगितले. त्यावर 9 लाख रूपये देईल असे सांगितल्यानंतर मधुकर बाविस्कर यांनी 11 नोव्हेंबर 2014 रोजी एकनाथ सोनवणे यांना सुरूवातीला 1 लाख रूपये रोख आणि मुलाचे सर्व कागदपत्रे जमा केले. त्यानंतर काही महिन्यानंतर पुन्हा 14 सप्टेंबर 2015 रोजी 50 हजार रूपये दिले. 24 फेब्रुवारी 2016 रोजी 1 लाख रूपये, 24 मार्च 2016 रोजी 2 लाख 45 हजार रूपये, 16 जुन 2016 रोजी प्लॉट विकून 1 लाख 25 हजार रूपये, 21 जुन 2017 रोजी पुन्हा प्लॉट विकून 1 लाख 50 हजार रूपये, 24 जुलै 2016 रोजी 1 लाख 30 हजार रूपये असे एकुण 9 लाख रूपये वेळोवेळी ठिकठिकाणी मधुकर बाविस्कर यांचा मामेभाऊ एकनाथ उर्फ छोटू आनंदा सोनवणे यांने फसवणूक केली आहे. पैश्यांविचारणा केली त्याने 3 लाख 40 हजार रूपये परत केले मात्र उर्वरित रक्कम 5 लाख 60 हजार रूपयांची फसवणूक केली. याप्रकरणी संशयित आरोपी एकनाथ सोनवणे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound