स्टॉकहोम-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | साहित्याचा नोबेल पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे. यावेळी दक्षिण कोरियाच्या हान कांग यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या हान कांग या अठराव्या आणि पहिल्या कोरियन महिला आहेत.
नोबेल समितीने हान कांग यांच्या ‘ग्रीक लेसन’ या कादंबरीवर विशेष चर्चा केली आहे. आयुष्यातील संकटांमुळे आवाज गमावलेल्या मुलीची ही कथा आहे. तिला ग्रीक शिक्षक भेटतात जे आपली दृष्टी गमावत आहेत. या कादंबरीत संवादातील अडथळे असतानाही दोन माणसांमध्ये फुलणाऱ्या नात्याचे सुंदर वर्णन केले आहे.
जीवनातील मार्मिक कथा सुंदर शैलीत सादर केल्याबद्दल त्यांना हा बहुमान मिळाला आहे. हान कांग यांनी १९९३ मध्ये कविता लिहून करिअरची सुरुवात केली. १९९५ मध्ये त्यांनी कथा लिहायला सुरुवात केली. त्यांना यापूर्वी २०१६ मध्ये ‘द व्हेजिटेरियन’ या कादंबरीसाठी मॅन बुकर इंटरनॅशनल पारितोषिकही मिळाले होते. या कादंबरीने त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली.