Home Cities जळगाव गिरणा धरणातून पाणी सोडण्यात आलेले नाही ; अफवा न पसरविण्याचे आवाहन

गिरणा धरणातून पाणी सोडण्यात आलेले नाही ; अफवा न पसरविण्याचे आवाहन

0
30

2girna 1

जळगाव (प्रतिनिधी) गिरणा धरणातून सद्यपरिस्थितीत पाणी सोडण्यात आलेले नाही. अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे उप अभियंता श्री. पाटील यांनी दिली आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर गिरणा धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क रहावे. गिरणा धरण ओव्हरफ्लो झाले. अशा पोस्ट टाकून त्यासोबत धरणाचे जुने फोटो टाकण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत असून संभ्रम निर्माण होत आहे. असेही उप अभियंता श्री. पाटील यांनी सांगितले.

 

गिरणा धरणात सध्या 93% पाणीसाठा आहे. पाटबंधारे विभागाच्या नियमानुसार गिरणा धरणात 15 सप्टेंबर पूर्वी 96% पाणीसाठा झाला तरच पाणी सोडण्यात येते. व 15 सप्टेंबर नंतर 100% पाणीसाठा असेल तरच पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येते. परंतु सध्या तशी कोणतीही परिस्थिती नाही. त्यामुळे अद्याप तरी धरणातून पाणी सोडण्यात आलेले नाही असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

 

धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे. येत्या काळात पाणीसाठा वाढल्यामुळे पाणी सोडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तर तसे अधिकृत कळविण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये व अफवांवर विश्वास ठेवू नये असेही श्री. पाटील कळविले आहे.


Protected Content

Play sound