रावेर शालीक महाजन । काँग्रेस पक्षात सक्षम नेतृत्वाचा अभाव असल्यामुळे आपण काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याचे प्रतिपादन येथील माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी यांनी केले. ते लाईव्ह ट्रेंडस् न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
रावेरचे माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी यांनी काल धुळे येथील संकल्प मेळाव्यात आपल्या समर्थकांसह काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून याचा आगामी विधानसभा निवडणुकीवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर, त्यांची पक्षांतराबाबतची भूमिका जाणून घेतली असता हरीश गणवानी म्हणाले की, काँग्रेसमध्ये सक्षम नेतृत्वाचा अभाव आहे. राहूल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर बरेच दिवस झाला तरी अध्यक्षपदाचा घोळ मिटला नाही. तर दुसरीकडे भाजपच्या सरकारने चांगली कामे केली असून यामुळे आपण या पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेशासाठी काही शब्द देण्यात आला आहे का ? अशी विचारणा केली असता त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. मात्र पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडून आपण प्रचारा सक्रीय होणार असल्याची माहिती हरीश गणवानी यांनी दिली.
पहा : नेमके काय म्हणाले हरीश गणवानी !