फैजपूर, ता. यावल निलेश पाटील । अलीकडेच निंबोल येथील विजय बँकेच्या शाखेत दरोडेखोरांनी शाखा व्यवस्थापकावर गोळ्या झाडल्याचे प्रकरण ताजे असतांनाच फैजपूर शहरातील बँकांची सुरक्षा ही फक्त सीसीटिव्हीच्या भरवश्यावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याबाबत वृत्त असे की, काही दिवसांपूर्वी नाशिक येथिल मुथुट फायन्स मध्ये चार अज्ञात दरोडे खोरांनी एक कर्मचार्याला गोळ्या झाडून ठार केले. यानंतर निंबोल येथील विजय बँकेत घुसून दोन दरोडे खोरांनी शाखा व्यवस्थापकाला गोळ्या झाडून ठार केले. निंबोल मध्ये घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर असे लक्षात आले आहे की तेथील विजया बँकेत सशस्त्र किंवा निःशस्त्र असा कोणताही सुरक्षारक्षक नव्हता. प्रत्येक बँकेत व्यवहार सुरू असतात. मात्र बँक सुरक्षा रक्षक देण्यात का काळजी घेत नाही. तशीच परिस्थिती फैजपूर शहरातील बँकांची आहे शहरात पाच बँका आहे त्यात भारतीय स्टेट बँक, युनियन बँक, शेतकर्यांची जिल्हा सहकारी बँक या चारही शाखेत एकही सुरक्षा रक्षक नसल्याचे समोर आले आहे. त्यात आयसीआयसी बँक यात नि:शस्त्र सुरक्षा रक्षक (सिक्युरिटी गार्ड) आहे. पण तो फक्त देखावा म्हणून उभा असतो कुठल्याही ग्राहकांची तपासणी न करता आत कसा सोडू शकतो.
काही बँकांमधील एटीएमसमोर रात्री देखील सुरक्षारक्षक नसतात. सुरक्षा रक्षक नसलेल्या आणि सशस्त्र सुरक्षा रक्षक नसलेल्या बँकांची आणि एटीएमची सुरक्षा वार्यावर असल्याचे चित्र समोर आले आहे.यातच काही अनुचित प्रकार घडला तर कोण जबाबदार राहणार? हा देखील प्रश्न उपस्थित होतो आहे. निंबोल येथील घटना घडल्या नंतर बँकांच्या नाकर्ते पणाचा कळस बघून फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी १४ ठळक मुद्दे असलेले पत्र बँकांना पाठवले आहे त्या पत्रांची खरोखर बँका दखल घेतील का हे बघणे गरजेचे आहे. शहरात सुदैवाने अजून कोणतीही दुर्दैवी घटना घडली नसली तरीही काळजी घेतली पाहिजे-पोलिसांनी, बँकेने,ग्राहकांनी आणि सुज्ञ, जबाबदार नागरिकांनीही! तरच अशा दुर्दैवी घटना टाळता येतील
सुरक्षा रक्षक नावापुरता
फैजपूर शहरातील सर्वच बँकेची विचारपूस केली असता लक्षात आले की, आयसीआयसी बँकेत सुरक्षा रक्षक जागेवर न थांबता दुसरीकडे फेरफटका मारतो. कोणत्याही ग्राहकांची चौकशी न करता ग्राहक आता येवून जातात. याबाबत तेथील व्यवस्थापक चंद्रकांत साकला यांना विचारणा केली असता आपल्या बँकेत सुरक्षा रक्षक आहे का? त्यांनी सांगितले हो आहे तर मग कुठे आहे तर त्यांनी सांगितले बँकेत फिरत असतो दुसरा प्रश्न विचारला असता त्या सुरक्षा रक्षक यांच्याकडे शस्त्र आहे का? तर त्यांनी सांगितले मला कुठलीही प्रतिक्रिया देण्याचा अधिकार नाही. एकंदरीत आयसीआयसी बँकेत सुरक्षा रक्षक आहे पण तो देखावा असल्याचे निर्दशनात आले आहे.
सुरक्षाधारी हवेच याबाबत एसबीआयचे शाखा व्यवस्थापक अनिल सावर्डेकर म्हणाले की, वरिष्ठांच्या म्हणण्यानुसार लोकल बँकेला सुरक्षा रक्षक दिला जात नाही आम्हला फक्त पैसे ने आण करण्यासाठी तात्पुरता सुरक्षा रक्षक मिळतो बँकेचे व्यवहार चांगले असल्याने या ठिकाणी शस्त्र धारी सुरक्षा रक्षक असणे गरजेचे आहे अन्यथा अनुचित प्रकार घडू शकतो आरबीओ कार्यालयात सुरक्षा रक्षक मिळावा या साठी मागणी केली आहे. तर युनियन बँकेचे शाखा व्यवस्थापक जयेश टोकरे म्हणाले की, निंबोल येथील घटनेने बँकेतील कर्मचार्यांमध्ये भितीचे वतावरण निर्माण झाले आहे. बँकेला लिमिटनुसार सुरक्षा रक्षक दिला जातो परंतु बँक जुनी असल्यामुळे बँकेची संपूर्ण माहिती आम्ही नाशिक कार्यालयात पाठवली आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन लवकरात लवकर सुरक्षारक्षक बँकेत द्यावा अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली आहे.