नाशिक, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राज्यात कोणीही येऊन अल्टीमेटम देऊ नये, महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे, येथे कोणाचीही हुकुमशाही चालवून घेतली जाणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुनावले आहे.
सरळमार्गाने भोंगे उतरणार नसतील तर दुप्पट आवाजात मशीदींसमोर हनुमान चालिसा वाजविण्याची भूमिका जाहीर करीत एकदा होऊन जाऊ द्या, एकदा अशी आक्रमक भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक येथे दौऱ्यावर आले असताना म्हटले आहे. राज ठाकरे यांचा सूर वातावरणावर अवलंबून असतो, ते कोणत्या वेळी भाषण करतात तसा त्यांचा सूर आहे. परंतु राज्यात कायद्यानेच चालावे लागेल, काम करताना हुकुमशाही चालवून घेतली जाणार नाही, येथे कोणीही अल्टिमेटम देऊ नये असे, औरंगाबाद येथील सभेत राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका करीत केलेल्या भाषणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते नाशिक दौऱ्यावर आले असताना प्रसारमाध्यमांशी बोलत होते.