भारतीय अनुसंधान परिषदेसाठी खान्देशातून दोघांची निवड

nivad samiti chopda

चोपडा प्रतिनिधी । दिल्ली येथे 16 व 17 जुलै रोजी होणाऱ्या भारतीय अनुसंधान परिषदेसाठी खान्देशातून प्रगतीशिल शेतकारी उदय महाजन आणि ॲड.प्रकाश पाटील या दोघांची निवड करण्यात आली आहे.

दिल्ली येथे दोन दिवसीय 16 आणि 17 जुलै रोजी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेसाठी तालुक्यातील चुंचाळी येथील प्रगतीशिल शेतकरी उदय महाजन आणि धुळे जिल्ह्यातील पडावद येथील कृषीभूषण ॲड.प्रकाश पाटील यांची निवड करण्यात आली. केंद्र सरकारच्या कृषी कल्याण विभागाच्या भारतीय कृषी अनुसंधान दिल्लीतील पुसा येथे होणाऱ्या परिषदेसाठी देशभरातील विविध राज्यातून तज्ञ शेतकऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.त्यासाठी महाराष्ट्र राज्यातून 12 शेतकऱ्यांची निवड झाली असून शेती क्षेत्रात नाविन्य पूर्ण कार्य केल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेण्यात आली.या संदभीर्य अहवाल कृषी विज्ञान केंद्र यांच्या शिफारसी नुसार केंद्र सरकारच्या दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान केंद्रा तर्फे या संस्थेच्या स्थापना दिवसाच्या मोहोत्सव निमित्ताने देशातून 100 शेतकऱ्यांना आमंत्रीत करण्यात आले आहे. त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.

Protected Content