कासोदा ता.एरंडोल (वार्ताहार) । येथील जवळच असलेल्या निपाणे येथील माजी उपसरपंच नथ्थू शेनफडू पाटील (वय-81) यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या 17 जून रोजी सकाळी 9 वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. धर्मराज नथ्थू पाटील यांचे वडील, राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुका उपाध्यक्ष किशोर धर्मराज पाटील यांचे आजोबा होते. त्यांच्या पश्चात 2 मुले, मुली, सुना, नातवंडे असा परीवार आहे.
निपाणे येथील माजी उपसरपंच नथ्थू पाटील यांचे निधन
6 years ago
No Comments