नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नागपूर अमरावती रोडवरील धामणालिंगा परिसरातील चामुंडा एक्सप्लोसिव्ह कंपनीत गुरूवारी स्फोट होऊन 6 निरपराध कामगारांचा जीव गेला. तीन गंभीर जखमी मजूरांवर नागपुरात उपचार सुरू होते. यातील एका जखमीचा शुक्रवारी, एकाचा शनिवारी आणि एकाचा रविवारी मृत्यू झाल्याने मृतकांची संख्या नऊ झाली आहे. आता या स्फोटातील कोणीही वाचलेला नाही. शनिवारी मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव श्रद्धा पाटील असे आहे. या स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला होता. प्रमोद चव्हारे याचा रविवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्याची प्रकृती चिंताजनक होती. शुक्रवारी दानसा म्हरसकोल्हे या कामागाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.
धामणा गावाजवळील चामुंडा एक्सप्लोसिव्ह कंपनीत गुरुवारी सकाळी झालेल्या स्फोटात 9 कामगार गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी सहा कामगार प्रांजली मोदरे, प्राची फलके, वैशाली क्षीरसागर, शीतल चटप, मोनाली अलोने आणि पन्नालाल बंदेवार यांचा घटनेच्या दिवशीच मृत्यू झाला होता. तर श्रद्धा पाटील, प्रमोद चव्हारे आणि दानसा म्हरसकोल्हे या तिघांवर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होता. शुक्रवारी सायंकाळी जानसा म्हरसकोल्हे याचा उपाचारा दरम्यान मृत्यू झाला होता. तर श्रद्धा पाटील आणि प्रमोद चव्हारे याच्यावर दंदे रुग्णालयात उपचार सुरु होता. उपचारा दरम्यान शनिवारी दुपारी श्रद्धा पाटील हिचा मृत्यू झाला तर प्रमोद चवारेवर उपचार सुरु होते.
कंपनीमधील गन पावडर अँड सेफ्टी फ्युज सेक्शनमध्ये स्फोट झाल्यामुळे पाच महिला आणि एक पुरुष अशा एकूण सहा व्यक्तींचा मृत्यू झाला होता. या स्फोटामध्ये जखमी असलेले दानसा मरसकोल्हे हे मूळचे मध्य प्रदेश येथील असून त्यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सुपूर्त करून मध्य प्रदेश येथे रवाना करण्यात आला. तसेच त्यांच्या वारसांना कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने रुपये 25 लाख इतक्या रकमेचा धनादेश देण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर ग्रामीणचे उपविभागीय अधिकारी आकाश औताडे, हिंगणा तहसीलदार सचिन कुमावत, नागपूर ग्रामीण तहसीलदार टेळे यांनी या दुर्घटनेतील मृतक परिवारांच्या मदतीसाठी हॉस्पिटल, कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली.