चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील निमगव्हाण येथील तापी फाउंडेशन व गावातील सेवाभावी युवकांनी कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात देण्याच्या उदात्त हेतूने धान्य संकलन फेरीचे आयोजन केले होते.
याबाबत माहिती अशी की, ग्रामस्थांनी सहभागी होत उस्फुर्त पणे सढळ हाताने धान्याची मदत केली. मदत फेरीच्या माध्यमातून २ तासाच्या कालावधीत संकलित झालेले ५ क्विंटल धान्य तहसिलदार अनिल गावित, नायब तहसिलदार राजेश पौळ, शेतकरी नेते एस.बी.पाटील यांच्या कडे सुपूर्त करण्यात आले. मदत फेरीमध्ये तापी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अनिल शिवाजी बाविस्कर, सदस्य लिलाधर बाविस्कर, प्रदीप बाविस्कर, देवानंद पाटील, प्रशांत पाटील, प्रकाश पाटील, मितांशू बाविस्कर, मयूर बाविस्कर, अनिल पाटील, वासुदेव बाविस्कर, अनिकेत बाविस्कर, मधुकर खंबायत, कमलेश बाविस्कर आदी उपस्थित होते.