शेंदुर्णी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी निलेश थोरात बिनविरोध

शेंदुर्णी ता. जामनेर प्रतिनिधी । शेंदुर्णी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाच्या रिक्त जागेवर भाजपाचे नगरसेवक निलेश उत्तमराव थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 

माजी उपनगराध्यक्षा चंदाबाई गोविंद अग्रवाल यांनी पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी आज गुरूवार १३ जानेवारी रोजी निवडणूक घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता त्यानुसार जामनेर तालुका तहसिलदार  पिठासिन निवडणूक अधिकारी होते सहाय्यक निवडूक अधिकारी म्हणुन नगरपंचायत मुख्याधिकारी साजिद पिंजारी काम पाहिले.

 

१३ जानेवारी  २०२२ रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याच्या वेळेत भाजप तर्फे निलेश उत्तमराव थोरात वार्ड क्र.१२ यांनी नामांकन दाखल केले अर्जावर सूचक म्हणून नगरसेविका सौ.चंदाबाई गोविन्द अग्रवाल तर अनुमोदक म्हणून नगरसेवक अलीम तडवी यांच्या सह्या होत्या विरोधी पक्ष राष्ट्रवादी व काँग्रेसचे वतीने वार्ड क्र.८ च्या नगरसेविका मोहसीना फारुख खाटीक यांनी नामांकन अर्ज दाखल केला अर्जावर सुचक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगरसेविका सौ.भावना धीरज जैन तर अनुमोदक म्हणून गटनेत्या वृषाली योगेश गुजर यांच्या सह्या होत्या सत्ताधारी भाजपचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व १३ नगरसेवक असून निवडणुकीत पक्षांच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करण्यासाठी सर्व नगरसेवकांना पक्षातर्फे व्हीप बजावण्यात आला होता.

 

विरोधी पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे ४ नगरसेविका निवडून आल्या असुन पक्षातर्फे कुठलाही व्हीप बजावण्यात आला नव्हता. विरोधासाठी विरोध न करता गावाच्या विकासासाठी विरोधी पक्षाच्या उमेदवार मोहसीन फारुख खाटीक यांनी माघार घेतल्याने  दुपारी १ वाजता  निलेश उत्तमराव थोरात यांची उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली सदरची निवडणुक ऑनलाईन पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीसाठी नगरंचायतीच्या नगराध्यक्षा विजयाताई खलसे, माजी उपगराध्यक्ष चंदाबाई अग्रवाल, सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच भाजप नेते, अमृत खलसे, उत्तमराव थोरात, गोविंद अग्रवाल यांची उपस्थिती होती.उपनगराध्यक्ष पदी निलेश थोरात यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आल्यानंतर सर्वांनी सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.

Protected Content