धरणगाव प्रतिनिधी | येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार निलेश चौधरी यांनी काल (दि.२७) झालेल्या एका जाहीर सभेत थेट व्यासपीठावरून धरणगावकरांना साष्टांग दंडवत घालून त्यांचे आशीर्वाद घेतले.
त्यांच्या या कृतीमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल एकप्रकारची आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काल झालेल्या माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रचार सभेत निलेश चौधरी यांनीही नागरिकांना भावनिक साद घालणारे छोटेखानी भाषण केले. त्यावेळी त्यांनी थेट व्यासपीठावरून मतदारांना दंडवत घातल्याने उपस्थित लोकही गहिवरले होते. सभेनंतर त्यांच्या या कृतीचीच उपस्थितांमध्ये चर्चा होती.