मुंबई प्रतिनिधी । अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणात आता एनआयएने अजून दोन कार जप्त केल्या असून याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर एका वाहनात जिलेटीनची स्फोटके टाकल्याच्या प्रकरणात दररोज नवनवीन गौप्यस्फोट होत आहेत. यात आता एनआयएच्या पथकाला नवीन मर्सडिज गाडी मिळाली असून याचा गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचा एनआयएचा संशय आहे. यामुळे आता या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणात वाहने हे अतिशय महत्वाचा भाग असल्याचे एनआयएच्या चौकशीतून दिसून आले आहे. याआधी त्यांनी स्कॉर्पिओ, इनोव्हा आणि मर्सडिज ही वाहने जप्त केली होती. यानंतर आज मर्सडिज आणि यानंतर प्रॅडो ही दोन वाहने ताब्यात घेण्यात आलेली आहेत. यामुळे आता या प्रकरणात जप्त केलेल्या वाहनांची संख्या पाचवर पोहचली असून याचा कसून तपास सुरू करण्यात आला आहे.