दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला ; 16 ठिकाणी एनआयएचे छापे

84025 407954 nia

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरात मोठे दहशतवादी हल्ले करण्य़ाच्या तयारीत असलेल्या तामिळनाडूतील अंसारुल्ला दहशतवादी संघटनेच्या १६ ठिकाणी आज एनआयएच्या पथकांनी छापे मारले आहेत. एनआयएने 16 जणांना अटक केल्याचीही अधिकृत घोषणा केली आहे.

 

एनआयएकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सैयद मोहम्मद बुखारी, हसन अली आणि मोहम्मद युसुफुद्दीन यांना भारतामध्ये मुस्लिम राज्याची स्थापना करायची होती. यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसा गोळा केला होता. या सर्वांवर गैर कायदेशीर कारवाया रोखण्याच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सैयद बुखारीच्या घरी आणि कार्यालयामध्ये छापे टाकण्यात आले आहेत. याशिवाय हसन अली आणि मोहम्मद युसुफुद्दीन यांच्या नागपट्टिनम जिल्ह्यातही ठिकठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. दरम्यान,एनआयएकडून 9 जुलै रोजी याबाबत गुन्हा दाखल केला होता. यामध्ये संशयित दहशतवादी चेन्नई आणि नागपट्टीनम जिल्हयातील राहणारे आहेत. याशिवाय भारतभर त्यांच्या संघटनेचे लोक असून ते देशाविरोधात लढाई छेडण्याच्या तयारीत होते, असे एनआयएचे म्हणणे आहे. तर 16 जणांना अटक केल्यानंतर एनआयएने याची अधिकृत घोषणा केली. हे सर्वजण भारतात दहशतवादी हल्ला करण्याच्या प्रयत्नात होते. या हल्ल्यासाठी ते आणखी काही जणांना जोडणार होते. यासोबतच ते हल्ला करण्यासाठी लोकांना स्फोटक, विष, चाकू आणि गाड्यांचे ट्रेनिंग देत असल्याची माहिती एनआयएने दिली आहे.

Protected Content