मुंबई प्रतिनिधी । मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अंबानींच्या निवासस्थानासमोर ठेवण्यात आलेल्या स्फोटकांच्या प्रकरणी कांदिवली स्थानकातील क्राईम ब्रांचचे अधिकारी सुनील माने यांना आज एनआयएने अटक केली आहे.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या स्फोटकांच्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे एनआयए चौकशी करत आहे. या प्रकरणात एपीआय सचिन वाझे हा प्रमुख आरोपी असून यासोबत पोलीस खात्यातील अनेक जण हे त्याचे साधीदार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या अनुषंगाने आज एनआयएने सुनील माने यांना अटक केली आहे.
सुनील माने हे कांदिवली पोलीस स्थानकातील क्राईम ब्रँचचे प्रमुख आहेत. त्यांना आज या प्रकरणात अटक करण्यात आली असून याबाबत एनआयएच्या सूत्रांनी माहिती दिली आहे.