न्हावी येथे फिरके दाम्पत्यातर्फे मंदिरात दानपेटी व सॅनिटायझर भेट

 

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील न्हावी येथील चंद्रशेखर फिरके व पत्नी रंजना फिरके यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त गावातील सर्व मंदीरासाठी दानपेटी व सॅनिटायझर भेट दिली.

कोरोना विषाणूपासून सर्वांचे संरक्षण व्हावे यासाठी अनेक दानशूर व्यक्ती कोणत्या ना कोणत्या मार्गे मदत करत आहे. तालुक्यातील न्हावी येथील रहिवाशी चंद्रशेखर रमेश फिरके व त्यांची पत्नी रंजना चंद्रशेख फिरके यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मोठे बाबा वसंत हिरामण फिरके यांच्याहस्ते न्हावी येथील कोरोना विषाणुच्या संक्रमणापासुन मंदीरात येणारे सर्वसामान्य दर्शनार्थी भावीकांचे व नागरीकांचे रक्षण व्हावे तसेच साखळी तोडणेस उपयोगी असे सामाजीक बांधीलकीच्या द्दष्टीकोणातुन पायाने वापरता येणारे सॅनिटायझर संच श्री विठ्ठल मंदिर न्हावी व बोरखेडा, श्री खंडोबा मंदिर, श्री राम मंदिर, श्री गणपती मंदिर (जुनी सिनेमा टाकीज चौक) श्री स्वामिनारायण मंदिर, श्री महादेव मंदिर व दुर्गा देवी मंदिर असे एकुण ८ संच भेट दिले.

याप्रसंगी अविनाश फिरके, नितीन चौधरी, प्रवीण वारके, राजू महाजन, भैय्या पाटील, युवराज तळेले, भोजराज चोपडे, प्रकाश मोतीवाले, मोतिराम तेली व सर्व मंदिरातील पुजारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी फिरके कुटुंबानी आगळ्या वेगळया पद्धतीने साजरा केलेला वाढदिवस व त्यांनी मंदीरात येणाऱ्या भाविकांच्या आरोग्यच्या दृष्टीने घेतलेली काळजी या उपक्रमामुळे त्यांचे न्हावी गावासह परिसरात कौत्तुक होत आहे .

Protected Content