शेंदूर्णी, प्रतिनिधी । नुकतेच शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे संस्थेच्या कार्याध्यक्षपदी सतीश काशीद व महिला संचालकपदी उज्ज्वला काशीद यांची निवड झाली असून त्यांनी आज संस्थेच्या शाळा,महाविदयालय यांना भेट देऊन पाहणी केली.
शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे संस्थेचे अध्यक्ष संजय गरूड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत संस्थेच्या कार्याध्यक्षपदी सतीश काशिद तर महिला संचालिकापदी उज्वला काशीद यांची नुकतीच निवड करण्यात आली. यानिवडी नंतर नूतन कार्याध्यक्ष सतीश काशीद व संचालिका उज्वला काशीद यांनी संस्थेच्या शाळा, महाविद्यालयात भेटी देऊन कामकाजाची व परिसराची माहिती जाणून घेत आहेत. आज त्यांनी संस्थेच्या शेंदूर्णी येथील अप्पासाहेब र.भा.गरुड कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली व महाविद्यालयात सुरू असणाऱ्या उपक्रमाची माहिती जाणून घेतली.
सतीश काशीद व उज्वला काशीद यांनी भेटी दरम्यान, प्राध्यापक व कर्मचारी यांचा परीचय करून घेतला व काही सूचनाही केल्या. या वेळी नवनिर्वाचित महिला संचालिका उज्वला काशीद यांनी संस्था अध्यक्ष.संजय गरूड यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने केलेल्या प्रगती विषयी गौरवोद्गार काढले. याभेटी प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव पाटील यांनी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी सतीश काशीद यांनी महाविद्यालया विषयी माहिती जाणून घेतली परिसराला आणि विभागांना भेट दिली. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापकांना संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाल्या बद्दल सतीश काशीद यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.