
रावेर (प्रतिनिधी) रावेर लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचित खासदार रक्षाताई खडसे यांचा सत्कार तालुक्यातील विवरे बु॥ ग्रामस्थांनी नुकताच केला.
यावेळी जिल्हा परिषद जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, तांदलवाडी सरपंच श्रीकांत महाजन, भाजपा तालुका सरचिटणिस तथा मा. सरपंच वासुदेव नरवाडे , सरपंच सुनिता सपकाळ , उपसरपंच रविंद्र वासनकर, ग्रामपंचायत सदस्य भागवत महाजन, मानस कुलकर्णी, माजी सरपंच आशा नरवाडे, भारती जिरी, अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या मध्यप्रदेश प्रदेशाध्यक्ष मालती महाराज, पंचायत समिती सदस्य योगिता वानखेडे, नरहरी पाटील, विजय पुराणे, वडगाव माजी सरपंच विनोद वाघोदे, दत्ता पाटील, गोपाळ बोरोले, शांताराम टेम्पे, सुभाष पाटील, बाळा बोरनारे, बिसन सपकाळे, अमान बिसमिल्ला, अरूण पाटील यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.