पुणे – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । ख्यातनाम नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या वाहनाने रिक्षाला धडक दिल्याने चालकाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी तिला अटक करण्याची मागणी होत असल्याने ती अडचणीत आली आहे.
पुण्यातील एक भीषण अपघात चर्चेत आला आहे. यात एका भरधाव वेगाने धावणाऱ्या कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. यात ती रिक्षा तीनदा पलटून यातील चालक गंभीर जखमी झाला. यानंतर कारमधील लोक उतरून तेथून निघून गेले. त्यांनी जखमी रिक्षा चालकाकडे पाहिले देखील नाही. ही कार ख्यातनाम नर्तकी गौतमी पाटील हिची असल्याचे निष्पन्न झाले असून या अपघातामुळे ती अडचणीत आली आहे.

या अपघाताच्या प्रकरणात गौतमी पाटील यांना अटक करण्याची मागणी होत आहे. यासाठी शिवसेना-उबाठा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करून अटकेची मागणी केली. तर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ व राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील या प्रकरणी तात्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे.
या प्रकरणी शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गौतमी पाटील हिच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती.



