नवी दिल्ली । शास्त्रज्ञांनी आता लाळेच्या मदतीने कोरोना संक्रमणाचे निदान करणारी चाचणी विकसित केली असून याच्या मदतीने तात्काळ व सुलभ पध्दतीत या विषाणूची बाधा समजणार आहे.
सध्या जगभरात कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यावर औषधी अथवा याच्या प्रतिकारासाठी उपयुक्त ठरणारी लस शोधण्यासाठी शास्त्रज्ञ मोठ्या प्रमाणात संशोधन करत आहे. याच प्रकारे कोरोना संक्रमणाचे निदान सोपे व गतीमान पध्दतीत करण्याचे प्रयत्न देखील सुरू झाले आहेत.
या अनुषंगाने अमेरिकेच्या एफडीए या संस्थेने लाळेचा नमुना घेऊन याची तपासणी करत कोरोनाच्या संक्रमणाचे निदान करण्याच्या नवीन पध्दतीला मान्यता दिली आहे. सलायव्हा डायरेक्ट या नावाने ही चाचणी ओळखली जाणार आहे. नावातच नमूद असल्यानुसार यात लाळेद्वारे कोविड-१९ विषाणूचे संक्रमण समजणार आहे.
सध्या कोरोनाचा संसर्ग समजण्यासाठी नाक अथवा घशातील स्त्रावाचा नमूना अर्थात स्वॅब घेतला जातो. याच्या मदतीने संक्रमण झालेले आहे की नाही याचे निदान करता येते. दरम्यान, ही पध्दत तशी थोडी खर्चीक असून यासाठी रिएजंटची आवश्यकता असते. सलायव्हा डायरेक्ट या प्रकारातील चाचणीसाठी अशा प्रकारचा स्वॅब न घेतला फक्त लाळेचा नमूना आवश्यक असणार आहे.
कोरोनाच्या प्रतिकारामध्ये तात्काळ निदान होणे हे अतिशय आवश्यक असते. या विषाणूचा संसर्ग झाल्याचे लवकर समजले तर यावर उपचार करून रूग्ण पूर्णपणे बरा होतो. यामुळे सलायव्हा डायरेक्ट ही निदान पध्दती उपकारक ठरणार असल्याचा आशावाद वैद्यकविश्वातून व्यक्त करण्यात येत आहे.
jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news