पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । काँग्रेसचे जळगाव जिल्हा सचिव शेख इरफान शेख इकवाल मणियार यांच्या मदतीने महावितरणचे पी. डी. (कायमचे बंद) योजनेंतर्गत शहराबाहेरील दोन ग्राहकांना या योजनेचा लाभ देण्यात आला व थकीत बिले वसूल करून नवीन मीटर देण्यात आले.
मागील चार वर्षापासून महावितरण कंपनीचे या ग्राहकांकडे बिल थकीत असल्याने वीज पुरवठा खंडित करून मिटर जप्त करण्यात आले होते. ग्राहकांनी मीटरसाठी खूप प्रयत्न केले. परंतु मीटर मिळत नव्हते. अखेर या ग्राहकांनी शेख इरफान शेख इक्बाल मन्यार यांच्याशी संपर्क साधून सांगितले असता त्यांनी दखल घेऊन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची चर्चा करून महावितरण कंपनीच्या योजनेअंतर्गत थकीत रक्कम जमा करून बाहेरपुरा भागातील सय्यद महेबूब सय्यद गुलाब व शकील मुसा टकारी ग्राहकांना नवीन मीटर देण्यात आले. यावेळी इरफान मन्यार, सहाय्यक अभियंता संदीप पाटील, प्रधान तंत्रज्ञान तुषार पाटील, सुनील पाटील, प्रवीण वंजारी, विवेक चनाळे, अविनाश कोळी, धर्मराज पाटील, फिरोज बागवान उपस्थित होते.