मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लाँच केली. यावेळी बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरही उपस्थित होती. ही जर्सी प्रसिद्ध जर्मन स्पोर्ट्सवेअर कंपनी एडीडासने बनवली आहे. बीसीसीआयने एक्स आणि इंस्टाग्रामवर नवीन जर्सीचा व्हिडिओ शेअर केला आहे.
टीम इंडियाची पूर्वीची जर्सी पूर्णपणे निळ्या रंगाची होती आणि तिच्या खांद्यावर एडीडासचे तीन पट्टे होते. यावेळी खांद्यावर असलेल्या तीन एडीडास पट्ट्यांना तिरंग्याची छटा देण्यात आली आहे. या जर्सीचा निळा रंग आधीच्या जर्सीपेक्षा किंचित हलका आहे, पण त्याच्या बाजूने गडद रंग देण्यात आला आहे.
महिला संघ वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्यांदाच नवीन जर्सी घालणार आहे. वेस्ट इंडिजचा संघ डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
भारतीय पुरुष संघ जानेवारी 2025 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदा या जर्सीत दिसणार आहे. सुरुवातीला भारत आणि इंग्लंड यांच्यात 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही टीम इंडिया या जर्सीत दिसणा