Home Cities जळगाव जळगावात व्यसनांची होळी

जळगावात व्यसनांची होळी

0
33

जळगाव प्रतिनिधी । आजची पिढी व्यसनांपासून दूर जावी यासाठी चेतना व्यसनमुक्ती केंद्र व रोटरी क्लब ऑफ जळगावतर्फे शहरातील शिवतीर्थ मैदानावर व्यसनांची होळी करण्यात आली.

व्यसनांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहे. यामुळे आपला देश व्यसनांपासून दूर व्हावा यासाठी व्यसनांची होळी करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विलास भोळे, डॉ. राजेंद्र भालोदे, डॉ. गंभीराराव पाटील, पोलिस निरीक्षक विलास सोनवणे, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, उदय पोतदार, विजय वानखेडे, डॉ. मयूर मुठे, प्रवीण पाटील, डॉ. जयंत जहागीरदार, डॉ. सतीश शिंदाडकर, डॉ.ए.एम. चौधरी, मुश्ताक सालार, चेतना व्यसनमुक्तीचे संचालक नितीन विसपुते, रोटरी क्लबचे कॅप्टन मोहन कुलकर्णी उपस्थित होते. या वेळी उपस्थित प्रत्येकाने कागदावर एका व्यसनाचे नाव लिखित त्याचे होळीत दहन केले. यानंतर व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound