Home Cities अमळनेर महाराष्ट्र साहित्य परिषदेची नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी संदीप घोरपडे !

महाराष्ट्र साहित्य परिषदेची नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी संदीप घोरपडे !


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) च्या अमळनेर शाखेची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यात संदीप बाबुराव घोरपडे यांची अध्यक्षपदी, तर रमेश यशवंत पवार यांची कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अमळनेरमधील साहित्यिक वर्तुळात या निवडीबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

निवृत्त उपप्राचार्य प्रा. शाम पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका विशेष बैठकीत ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. या वेळी प्रमुख कार्यवाहपदी दिनेश वसंतराव नाईक आणि कोषाध्यक्षपदी उमेश प्रतापराव काटे यांचीही बिनविरोध निवड झाली.

नवीन कार्यकारिणीतील इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्षपदी भाऊसाहेब मल्हारराव देशमुख, कार्यवाहपदी विजया राजेंद्र गायकवाड यांचा समावेश आहे. तसेच, नरेंद्र दिनकरराव निकुंभ, डॉ. रमेश नामदेव माने, दिलीप राजाराम सोनवणे, निरंजन रमेश पेंढारे, गोकुळ गोविंदा बागुल, शरद भिका पाटील, प्रा. डॉ. ज्ञानेश्वर मोहन मराठे, भारती संजय सोनवणे, सुनीता रत्नाकर पाटील हे सदस्य म्हणून निवडले गेले आहेत. मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, निवृत्त उपप्राचार्य प्रा. श्याम पवार आणि मुख्याध्यापक रणजीत शिंदे यांच्या समितीने सर्व सदस्यांच्या सहकार्याने ही निवड प्रक्रिया पार पाडली.

दरम्यान, नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात कार्यकारी मंडळाची एक महत्त्वपूर्ण सभा पार पडली. या सभेत नवीन कार्यकारिणीचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले, तसेच मार्च २०२५ ते जून २०२५ या कालावधीतील जमा-खर्चास मंजुरी देण्यात आली. नवीन कार्यकारिणीसोबत विश्वस्त आणि नामनिर्देशित दोन सदस्यांची निवड करण्यावरही चर्चा झाली. स्थानिक दोन लेखकांच्या पुस्तकांचे वाचन व चर्चासत्र आयोजित करणे आणि संस्थेच्या आगामी कार्यक्रमांची रूपरेषा ठरवण्यावरही विचारमंथन झाले. विशेषतः राज्य नाट्य स्पर्धेसाठी नाटकाची निवड करून मसाप, पुणे येथे प्रस्ताव पाठविण्याबाबत चर्चा करण्यात आली. प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून अमळनेरमधील साहित्य क्षेत्राला निश्चितच नवी ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा आहे.


Protected Content

Play sound