Home धर्म-समाज दोडे गुजर समाजाची भुसावळ परिसरासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर

दोडे गुजर समाजाची भुसावळ परिसरासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर


भुसावळ- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दोडे गुजर समाज संस्था भुसावळ परिसर साठी रजिस्ट्रेशन व नवीन कार्यकारणी निवड संदर्भात संजय पाटील (गरुड प्लॉट)येथे यांच्या निवासस्थानी आयोजित केली होती.

डॉ कैलास पाटील यांनी अध्यक्ष महेश पाटील यांच्याशी संपर्क साधल्या नंतर त्यांनी नविन कार्यकारिणीसाठी अनुमती दिली व युवा नेतृत्वाला संधी द्यावी असे सांगितले. त्यानंतर उपस्थित सदस्यांमध्ये मिटिंग अतिशय आनंदमय वातावरणात संपन्न झाली.

याप्रसंगी सर्वानुमते नवीन कार्यकारिणी निवड पुढिल प्रमाणे:-
अध्यक्ष:- संजय विठ्ठल पाटील; कार्याध्यक्ष:- किशोर पंढरीनाथ चौधरी; सचिव:- चंद्रशेखर गोरख पाटील; उपाध्यक्ष:- महेंद्र मनिलाल पाटील; उपाध्यक्ष:- निलेश सुरेश पाटील;सहसचिव:- उमाकांत मधुकर पाटील;कोषाध्यक्ष:- दिपक सुरेश चव्हाण;संघटनप्रमुख:- धनराज मधुकर पाटील
संघटनप्रमुख:-दिपक सोपान पाटील;संघटनप्रमुख:- अजय गोकुळ पाटील; संचालक:- संदिप संतोष पाटील; संचालक:- डॉ. कैलास भावलाल पाटील;संचालक:- विलास बापुराव पाटील

या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक- हिरालाल व्यंकट पाटील, अरुण पाटील (पत्रकार), महेश पाटील, डॉ. सूर्यभान पाटील, हरिचंद्र पाटील, अंकुश पाटील, अमित पाटील, नारायण पाटील, डी. जी पाटील, ईश्वर चौधरी; गणेश पाटील, आर. बी पाटील, विजय चव्हाण, जिवन पाटील यांची सर्वानुमते नियुक्ती केली असून नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांची दोडे गुजर समाज भुसावळ परिसरातून अभिनंदन होत आहे.


Protected Content

Play sound