Home क्राईम रेल्वे स्थानकावर थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद; रेल्वे पोलिसांनी वाचविला प्रवाशाचा जीव!

रेल्वे स्थानकावर थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद; रेल्वे पोलिसांनी वाचविला प्रवाशाचा जीव!

0
268

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव रेल्वे स्थानकावर 5 ऑगस्ट रोजी रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास भुसावळ-सुरत एक्स्प्रेस मध्ये एका प्रवाशाचा जीव वाचल्याची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहे. कर्तव्य बजावत असलेले पोलीस शिपाई किरण वसंत बारी यांच्या सतर्कतेमुळे आणि प्रसंगावधानामुळे एक मोठा अपघात टळला. अशी माहिती भुसावळ आरपीएफ चे पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांनी दिली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, पाच ऑगस्ट रोजी रात्री पावणे नऊ वाजता भुसावळ-सुरत एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात एक प्रवासी चढत असताना अचानक गाडी सुरू झाली. गाडी चालू झाल्याने प्रवाशाचा तोल गेला आणि ते फलाट व ट्रेनच्या मध्ये पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. हा धोका वेळीच ओळखून ड्युटीवर असलेले पोलीस शिपाई किरण वसंत बारी यांनी तत्काळ धाव घेतली आणि त्या प्रवाशाला फलाटावर खेचून घेतले. त्यांच्या या धाडसामुळे प्रवाशाचा जीव वाचला आणि एक संभाव्य मोठा अपघात टळला. हे घटना रेल्वे स्थानकात जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पोलीस शिपाई बारी यांनी जीव वाचवलेल्या प्रवाशाचे नाव प्रल्हाद शिंपी असे आहे. जीव वाचवल्याबद्दल प्रल्हाद शिंपी यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. किरण वसंत बारी यांच्या या शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound