यावल प्रतिनिधी । यावल येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आज, ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता अखिल भारतीय सरपंच परिषदेची नवीन कार्यकारिणी निवडीबाबत बैठक पार पडली असून तालुकाध्यक्षपदी अजय भालेराव तर उपााध्यक्षपदी प्रदीप कोळी यांची निवड करण्यात आली आहे.
ही सभा अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा अध्यक्ष पुरुजीत गणेश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला संघटने चे तत्कालीन तालुका अध्यक्ष देविदास पाटील तसेच कार्याध्यक्ष नरेंद्र पाटील व तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच बंधू आणि भगीनी मोठ्या उपस्थित होत्या.
नवनियुक्त कार्यकारीणाचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष पुरुजीत चौधरी यांनी मार्गदर्शन करतांना सरपंचा ना येणाऱ्या अडी अडचणी तसेच विविध समस्या सोडवण्यास मदत करण्यावर संघटनेचा भर राहील तसेच ही संघटना कुठलेही राजकिय नसून या संघटनेचा सरपंच हाच केंद्रबिदू राहील कुठलेही पक्षीय राजकारण या संघटनेमध्ये येणार नाही, असे मार्गदर्शन केले. या सोबत नवनियुक्त पदधिकारी यांना जवाबदारी काम करण्याचा सल्ला दिला.
यावेळी सरपंच संघटनेची नुतन कार्यकारीणी खालील प्रमाणे घोषीत करण्यात आली. यावल तालुका अध्यक्ष अजय भागवत भालेराव ( सरपंच वड्री ता . यावल ), महिला तालुका अध्यक्षपदी भारतीताई चौधरी (सरपंच न्हावी ), उपाध्यक्ष प्रदीप कोळी (सरपंच भालोद ) , सरचिटणीस जयेश तायडे (सरपंच कोसगाव ) , कार्याध्यक्ष खेमचंद कोळी (प्रभारी सरपंच पाडळसे ) तसेच सदस्य म्हणून वेणूबाई भिल, बेबाबाई पाटील, रुकसाना तडवी, जमशेर तडवी, मंगला कोळी, प्रतिभा पाटील, सूषमा पाटील, ज्योती कोळी, नंदुभाऊ सोनवणे, राजेश तळेले यांची निवड घोषीत करण्यात आली.