मुंबई-वृत्तसेवा । सर्वोच्च न्यायालयाने आज पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नवीन कालमर्यादा दिली असून यामुळे आगामी चार महिन्यात सर्व निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या असून सुप्रीम कोर्टाने आधी देखील राज्य निवडणूक आयोगाला यासाठी निर्देश दिले होते. मात्र या कालावधीत निवडणुका शक्य न झाल्याने आज पुन्हा या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.

या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 च्या आत सर्व म्हणजेच महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आदींच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे आगामी चार महिन्यांच्या आत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येतील हे स्पष्ट झाले आहे



