Home क्राईम न्यू बी.जे. मार्केटमधून चोरट्यांनी दुचाकी लांबविली

न्यू बी.जे. मार्केटमधून चोरट्यांनी दुचाकी लांबविली

0
37

जळगाव प्रतिनिधी । शहरातील नवीन बी.जे. मार्केट येथून एकाची १० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघड झाले आहे. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय यशवंत खडके (वय-४२) रा.महाबळ गाडगेबाबा चौक जळगाव हे कामाच्या निमित्ताने २५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ६ दरम्यान नवीन बीजे मार्केटमधील मैत्रेय ऑफिस जवळ आले. त्यावेळी त्यांनी त्यांची मालकीची (एमएच १९ ए सी ६५४५) क्रमांकाची दुचाकी पार्किंगला लावली होती. अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला लावलेली दुचाकी चोरून नेल्याचे सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. त्यांनी परिसरातच दुचाकीचा शोध घेतला परंतू मिळून आली नाही. याप्रकरणी विजय खडके यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जिल्हापेठ पोलिस कर्मचारी करीत आहे.

 

 


Protected Content

Play sound