जामनेर, प्रतिनिधी । येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत तालुक्यातील नेरी येथील अंगणवाडी केंद्रात राष्ट्रीय पोषण आहार अभियानांतर्गत बालक-पालक मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका पी.पी.धनगर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी स्वप्ना कुमावत यांनी बाळाचे १ हजार दिवस याविषयी तर निशा तेली यांनी सापसिडी खेळातून आहार व आरोग्य या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या मेळाव्यात महिलांनी विविध पाककृतींचे स्टॉल लावण्यात आले होते. त्यातून महिलांना विक्री करण्याचा पहिल्यांदाच अनुभव मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास देखील वाढल्याचे दिसून येत होते. उपस्थित मातांना पोषण प्रतिज्ञा देण्यात आली. शिला पाटील यांनी आपल्या प्रास्तविकातून कार्यक्रमाची रूपरेषा व संकल्पना स्पष्ट केली. यावेळी तालुका तंत्र सहाय्यक सागर सर, रेखा नेरकर, संगिता महाजन, जिजा शिंदे, नंदा कोळी यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी परिश्रम घेतले.