नेरी नाकाजवळील हार्डवेअर दुकान फोडले; ९६ हजारांचा मुद्देमाल लांबविला

जळगाव प्रतिनिधी । शहरातील नेरी नाकाजवळ असलेल्या अशोक हार्डवेअर दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी ९६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जितू बलराम आहूजा (वय-३४) रा. नानक निवास नवजीवन सोसायटी सिंधी कॉलनी यांचे शहरातील नेरी नाकाजवळ असलेल्या मटनमार्केटच्या बाजूला अशोक हार्डवेअर नावाचे दुकान आहे. १३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री अडीच ते साडेतीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या बाजूची खिडकीचा पत्रा वाकवून दुकानातून सुमारे ९६ हजार ५०० रुपये किमतीचे प्लॅनेट पॉवर कंपनीचे बोर मशीन, हॅमर मशीन, कटर मशीन आणि डोअरचे ३० किट असा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी 13 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलिस ठाण्यात जीतू अहुजा यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तुषार जावरे करीत आहे.

 

Protected Content