जुन्या वादातून रिक्षा चालकासह पुतण्या व चुलत भावाला बेदम मारहाण

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातील विकास कॉलनी परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून रिक्षा चालकासह पुतण्या व चुलत भावाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता मारहाण करणाऱ्या ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, शेख मजहर शेख मस्जिद (वय-२३) रा. विकास कॉलनी, वरणगाव ता. भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रिक्षा चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून शेख मजहर शेख मस्जिद यांच्यासह पुतण्या फरहान समिर शेख आणि मुक्तार शेख यांना गावात राहणारे दानेश अली मुजाहित अली सैय्यद उर्फ अप्पा यांच्यासह इतर १० जणांनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. यात तिघेजण जखमी झाले. त्यांना तातडीने वरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता वरणगाव पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार मारहाण करणारे दानिेश अली मुजाहित अली सैय्यद उर्फ आप्पा, आकिब अली कमर अली सैय्यद, जुबेर अली जाकीर अली सैय्यद, अजहर रहिम शेख उर्फ मोटा, अजहर अली तय्यब अली सैय्यद, शेख एहसान उर्फ डॉक्टर, इरफान अली आशिक अली सैय्यद उर्फ लुड्या, नजीर अली वरील अली सैय्यद, फिरोजी शकील शेख , जाकीर अली वजीर अली सैय्यद आणि जुनेद अली जाकीर अली सर्व रा. वरणगाव यांच्या विरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परशुमरा दळवी करीत आहे.

Protected Content