जळगाव, प्रतिनिधी | जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व हॉकी जळगाव आयोजित जिल्हास्तरीय १७ वर्षा आतील मुलांच्या गटात बी झेड भुसावळचा संघ अंतिम विजेता ठरला. त्याने डॉ उल्हास पाटील, सावदा हिचा पेनल्टी स्ट्रोक वर २-१ने पराभव करीत स्पोर्ट्स हाउस तर्फे दिला जाणारा नेहरू चषक पटकाविला. तर बी झेड चा आदिल शेख हा उत्कृष्ट गोलकीपर ठरल्याने त्यास स्वर्ण पदक देण्यात आले.
पारितोषिक वितरण जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, हॉकी महाराष्ट्र च्या सहसचिव प्रो. डॉ. अनिता कोल्हे व हॉकी जळगावचे सचिव फारूक शेख यांच्या हस्ते करण्यात आले.सूत्रसंचालन लियाकत अली सैयद व आभार क्रीडा संकुलाचे प्रशिक्षक अरविंद खांदेकर यांनी मानले.
तत्पूर्वी सर्व स्पर्धा पाऊसा मुले पेनल्टी स्ट्रोक वर घेण्यात आल्या त्याचा निकाल खालील प्रमाणे
स्पर्धेचा निकाल
१- बियाणी पब्लिक स्कुल भुसावळ वि वि डॉ उल्हास पाटील स्कुल भुसावळ (३-१)
२- डॉ उल्हास पाटील स्कुल सावदा वि वि इंपिरियल इंटरनॅशनल स्कुल पाळधी (३-१)
उपांत्य सामने
३- बी झेड उर्दू हायस्कुल भुसावळ वि वि बियाणी पब्लिक स्कुल भुसावळ (२-०)
४- डॉ उल्हास पाटील स्कुल सावदा वि वि रुस्तमजी इंटरनॅशनल स्कुल (३-१)
अंतिम सामना :
५- बी झेड उर्दू हायस्कुल भुसावळ वि वि डॉ उल्हास पाटील स्कुल सावदा (२-१)
स्पर्धेत पंच म्हणून लियाकत अली अब्दुल मोहसीन, मजाझ खान, शोएब अली, झुबेर खान, इम्रान शेख, यांनी काम केले