यावल, प्रतिनिधी । येथील सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शासकीय विश्रामगृह आंबट शौकिनांचा अड्डा बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने विश्रामगृहाच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
याबाबतचे वृत्त असे की, शासकीय विश्रामगृह परिसरात शाळा, व शासकीय आयटीआय आहे. नेहमीच वर्दळीचे ठिकाण आलेले हा परिसर गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. हा संपुर्ण परिसर निर्मनुष्य असल्याने याचा गैरफायदा घेऊन काही आंबटशौकीन तरुण तरूणी घेत असल्याचा प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे. या शासकीय विश्रमगृहाच्या रक्षणासाठी वाचमन नसल्याने मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात येत आहे. यातच सायंकाळी तळीरामांनी त्यांचा अड्डा बनविला आहे. दरम्यान, शासकीय विश्रामगृहाची ही वाईट अवस्था गेल्या दोन वर्षापासुन झाली आहे. यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभाग या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने या विभागाच्या कारभारावर नागरीकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत. विभागाने तात्काळ या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यास काही अप्रीय घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार असेल ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.