जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरूण परिसरात गेल्या वीस दिवसांपासून अमृत योजनेच्या अंतर्गत काम सुरु होते. त्यात परिसरातील शेरा चौकात दोन मोठे खड्डे करून ते तेव्हापासूनच उघडे पडून होते. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने खड्डे बुजवण्यासाठी नागरिकांकडून वारंवार तक्रारी व निवेदन देवून मनपा दुर्लक्ष करीत असल्याने आज राष्ट्रवादीचे साहिल पटेल यांनी अनोखे आंदोलन केले.
शेरा चौक हा मेहरूण मधील मोठा रहदारीचा भाग आहे, तसेच गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव शहरासह इतरही ठिकाणी अमृत योजनेचे काम संथगतीने सुरु आहे, त्यामुळे नागरिकांचे हाल हे सुरूच आहे. मेहरूण येथील शेरा चौकात गेल्या वीस दिवसापासून अमृत योजनेच्या कामानिमित्त पाईपलाईनसाठी दोन खड्डे केले होते. पण त्याचे कामही पूर्ण होत नसल्याने नागरिक अपघाताच्या भीतीच्या सानिध्यात जगत होते. त्या खड्ड्यांना बुजवण्यासाठी नागरिकांनी संबंधित नगरसेवक व अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार व निवेदन दिले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यासाठी आज राष्ट्रवादीचे साहिल पटेल यांनी आंदोलन करण्याचे ठरवले असता. संबंधित एम आय एम चे नगरसेवक रियाज बागवान तेथे आले. त्यांनी खड्डे माती टाकून बुजवण्याचे काम सुरू केले. एक खड्डा बुजवल्या नंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पाईपलाईन न तक्ता खड्डे का बुजवता असा सवाल केला. व दुसऱ्या खड्ड्यात कार्यकते उतरले आणि त्यात पाणी व मासे टाकले. त्याच बरोबर काम पूर्ण न कर्ता बुजवलेल्या खड्ड्यावर गुलाबाची फुलं वाहून राष्ट्रवादीचे साहिल पटेल, डॉ. रिजवान खाटीक, रिजवान जहागीरदार, नबील शेख, रफिक शेख, हाशिम पटेल, महमूद शेख, जाहिद शाह, यांनी श्रद्धांजली देऊन अनोखे आंदोलन केले.